मुंबई | हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मुंबई, ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात पुढच्या 3 तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. उत्तर महाराष्ट्रातही ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी गारपिटीची शक्यता कुलाबा वेधशाळेने व्यक्त केली आहे.
आजपासून तीन दिवस उत्तर महाराष्ट्रातल्या धुळे, जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पालघर जिल्ह्यात काही ठिकणी अवकाळी पावसाची हजेरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, पालघर तालुक्यातील, बोईसर, पालघर, माहीम, केळवे, सफाळे, सातपाटी, भागात पाऊस सुरू झाला आहे. यामुळे नागरिकांनी हवामानचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
थोडक्यात बातम्या-
भाजप आमदाराच्या पोस्टरवर एकनाथ खडसेंचा फोटो; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
फिटनेस चाचणीमध्ये रोहित शर्मा पास; ऑस्ट्रेलियाला होणार रवाना
‘काँग्रेसला संपवण्याचा हा एक मोठा कट आहे’; काँग्रेस नेत्याचा गंभीर आरोप
लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्यांना थेट पुढच्या वर्षीच; मुंबई महापालिका आयुक्तांचे संकेत
शेतकऱ्यांचे आंदोलन भाजपच्या अंगलट, हरियाणातील खट्टर सरकार संकटात