नाशिक | मालेगावात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वळवाडे भागात असलेला कलमदरा बंधारा फुटला आहे. त्यामुळे वळवाडे, आंबसन, गारेगाव, वाघखोरे यासह इतर अनेक गावात पाणी शिरलंय.
हा बंधारा फुटल्याची माहिती मिळताच पाटबंधारे आणि महसूल विभागाचे अधिकाऱ्यांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीन मदतकार्य सुरु केलं.
पाणी शिरल्यामुळे शेकडो टन कांदा भिजून खराब झाला आहे. या बंधारा फुटीचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत.
दरम्यान, नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार सी.आर.राजपूत यांनी दिलेत.
महत्वाच्या बातम्या-
‘मला घाबरवायचा प्रयत्न केलात तरीही…’; कंगणाने केलं मराठीतून ट्विट
चिंताजनक! राज्यात आज 22 हजारांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद
कोरोनावर मात केल्यावर गोपीचंद पडळकरांवर जेसीबीतून 100 पोती फुलांचा वर्षाव
जब तक दवाई नही तब तक ढिलाई नही- नरेंद्र मोदी
Comments are closed.