महाराष्ट्र मुंबई

पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून पावसाने उसंत घेतलीये. मात्र दडी मारून बसलेला पाऊस राज्यामध्ये पुन्हा सक्रीय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढच्या 4 ते 5 दिवसांमध्ये राज्याच्या अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवलाय.

पुढच्या 4 ते 5 दिवसांत मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं ट्विट प्रादेशिक हवामान विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसळीकर यांनी केलंय. याचप्रमाणे सोमवारपासून पावसाचा जोर वाढेल तसंच घाट भागातही अतीमुसळधार पावसाची शक्यता असल्याचं होसळीकर यांचं म्हणणं आहे.

 

सर्वाधिक पावसाच्या कोकण विभागातील पालघर, रायगड, ठाणे जिल्ह्यासह आता रत्नागिरीतील पाऊसंही सरासरीच्या तुलनेत मागे पडतोय. मध्य महाराष्ट्रातील साताऱ्यापाठोपाठ पुणे, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही पावसाचे प्रमाण कमी असल्याचं दिसून आलंय. अशात हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजामुळे दिलासा मिळू शकतो.

विदर्भात दोन-तीन जिल्हे वगळता सर्वच भागांत पाऊस सरासरीच्या तुलनेत मागे आहे. मराठवाड्यात मात्र पावसाने जुलैची सरासरी ओलांडली आहे. मुंबई परिसर, कोकणातील काही भाग आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावलीये. इतरत्र पावसाने विश्रांती घेतल्याने पाणीसाठय़ातील वाढ थांबली असून, शेतकऱ्यांकडूनही चिंता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचं प्रदीर्घ आजारानं निधन

मटका किंग मुन्ना उर्फ जिग्नेश ठक्कर याची त्याच्याच ऑफिससमोर गोळ्या घालून हत्या

‘साहेब झोपूनच असायचे रिया मॅडम मात्र…’ सुशांतच्या बाॅडिगार्डचे धक्कादायक खुलासे

आत्महत्येच्या रात्री नक्की काय घडलं?; सुशांतच्या मित्राने केला खुलासा

‘सुशांत संशयास्पद औषधं घेत होता’, जीम ट्रेनरचा धक्कादायक खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या