बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

मुंबई | राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोकणासह, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि विदर्भात नागपूर-गडचिरोली, अकोला भागात पावसाने चांगलीच बॅटींग केली आहे. तसेच कोल्हापूरमधली परिस्थिती नियंत्रणात आली नाही. अशात हवामान खात्याने पुढील 3 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे राज्यासमोरील संकट वाढल्याचं दिसत आहे.

कोकणात सलग दोन दिवस अतिवृष्टी आणि जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. 24 ते 27 जुलैदरम्यान रायगड, सिंधुदुर्ग ठणे पालघर या जिल्ह्यांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुणे, कोल्हापूर, साताऱ्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. पुढचे 3 ते 4 दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहे. कोकण आणि गोव्यात 24 तारखेलाही हवामान विभागाने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे

मध्य महाराष्ट्रात घाटमाथ्याचा परिसर, सातारा, पुणे, कोल्हापूर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच 27 जुलैपर्यंत मराठवाड्याच्या औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, लातूर, उस्मानाबाद या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

केंद्र सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय; जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ सूचना

चिंताजनक! राज्यातील नव्या बाधितांची आकडेवारी नियंत्रित मात्र मृतांची आकडेवारी….

कुंद्राच्या काळ्या साम्राज्याचा राज उघड, व्हिडीओंसाठी घेतलेले पैसे ऐकाल तर थक्क व्हाल!

दिलासादायक! मुंबई कोरोनामुक्तीच्या वाटेवर, नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More