मुंबई | गेल्या चार दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. त्यातच आता पुण्यासह राज्यभर पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे.
पुणे शहरात पावसाच्या जोरदार सरींनी हजेरी लावली. सोमवारी रात्री साठेआठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे पुणे शहरात 3.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर लोहगाव येथे 9.2 मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे.
पुढील दोन दिवस शहरात पावसाचा जोर वाढेल, अशी माहिती देखील हवामान विभागाने दिली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यात आणि विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ऑरेंज अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.
थोडक्यात बातम्या-
पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर
करुणा शर्मांची बीड जिल्हा कारागृहात रवानगी, पाहा व्हिडिओ
भाजपला मोठा धक्का! मोदी लाट आता चालणार नाही, ‘या’ अहवालातून स्पष्ट
कालच्या आकडेवाढीनंतर आजची मुंबईची कोरोना आकडेवारी; वाचा एका क्लिकवर
विराटसेनेने रचला इतिहास! तब्बल 50 वर्षांनंतर केली ‘ही’ ऐतिहासिक कामगिरी
Comments are closed.