बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या आठवड्याभरात पावसाने थैमान घातले होते. आता कुठे दोन दिवसांपूर्वी पावसाने जरा उसंत घेतली आहे. तोवर पुन्हा विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा (Rain Alert) इशारा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) सध्या विदर्भातील वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या पाहणीसाठी दौऱ्यावर आहेत. मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

विदर्भातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर अमरावती, यवतमाळ, बुलढाणा आणि भंडारा या जिल्ह्यांत मागील आठवड्याच्या पावसामुळे पूरस्थिती आहे. आज अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. उपराजधानी नागपूरात (Nagpur) महानगरपालिकांच्या बेजबाबदार नियोजनामुळे शहरातील रस्ते पाण्याखाली गेले असून अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

विदर्भातील नागपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत येलोे अलर्ट आहे. तर वर्धा जिल्ह्यात फक्त आजपुरता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

सध्या ऑरेंज अलर्ट असलेल्या जिल्ह्यांना गुरूवारपासून पावसाची भीती नसल्याची दिलासादायक माहिती  आहे. हवामान विभागाने गुरुवारपासून पावसाचे संकेत नसल्याचं सांगितलं.

थोडक्यात बातम्या –

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती

उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!

सुष्मिताबाबत एक्स बाँयफ्रेंड विक्रम भट्ट यांचा मोठा खुलासा, म्हणाले…

अभिनेता महेश बाबूनंतर अल्लू अर्जुनचं बॉलिवूडबाबत मोठं वक्तव्य, म्हणाला…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More