मुंबई | शेतकऱ्यांची चिंता आता संपणार आहे. राज्यात पावसाने मोठा ब्रेक घेतला होता. त्यानंतर पाऊस (Rain) आता पुन्हा सुरु झालेला आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस विदर्भाला यलो अलर्ट दिला आहे.
विदर्भासह मराठवाडा आणि खान्देशात शनिवारी पावसाचा यलो अलर्ट आहे. जळगाव, औरंगाबाद, नांदेड, परभणीसह संपूर्ण विदर्भात 19 ऑगस्ट रोजी यलो अलर्ट दिला आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे दुबार पेरणीचं संकट निर्माण झालं होतं. परंतु आता पाऊस परतल्याने पिकांना जीवनदान मिळालं आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस पाऊस कायम राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
गुरुवारी मध्यरात्रीपासून भंडाऱ्यात पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. गेल्या पंधरा दिवस पाऊस नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होता.
महत्त्वाच्या बातम्या-