पुढील काही दिवस ‘या’ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली | गेल्या काहि दिवसांपासनू काही राज्यांत पावसाची(Rain) जोरदार बॅटिंग सुरू आहे. तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच आता पुन्हा भारतीय हवामान खात्यानं(Department of Meteorlo दहा राज्यांना जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.

7 ते 8 डिसेंबरच्या दरम्यान दक्षिण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळं पुढच्या सात-आठ दिवसांत दक्षिण पूर्व राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवमान खात्यानं वर्तविली आहे. तसेच मंगळवारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू राज्यांत पावसाचा जोर दिसून येईल, असंही सांगण्यात आलं आहे.

पाॅंडेचरी आणि आंध्रमध्ये ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. अंदमान निकोबार बेटावरही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच पूर्व, मध्य आणि इशान्य भारतात धुके पडण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.

सध्या मध्य आणि उत्तर भारतातील हवेची गुणवत्ता खराब आहे. कर्नाटक, केरळमध्येही विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच हिमाचल प्रदेशात पहाटे दाट धुकं पडू शकते, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात नोव्हेंबर महिन्यात इशान्य मान्सून सक्रिय न झाल्यानं आता कमी पाऊस पडेन, असा अंदाज आहे. तसेच दक्षिणेकडं मात्र, अतिवृष्टी होऊ शकते,असाही हवामान खात्याचा अंदाज आहे. उत्तर तामिळनाडू आणि चेन्नईमध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळं जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडू शकतो.

डोंगराळ भागात सघ्या बर्फवृष्टी सुरू आहे. दरम्यान, पुढील तीन महिने दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये थंडी वाढू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या-