बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 48 तास धोधो पाऊस; ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुणे | राज्यात मागील सप्टेंबर महिन्यात पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला होता. त्यानंतर ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून मान्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केला. राज्यात येत्या शनिवारी आणि रविवारी विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात पावसाचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात यावर्षी पावसानं दमदार हजेरी लावली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव तयार झाल्याने राज्यात पाऊसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. त्यामुळं परतीच्या पावसानंतर राज्यात पुन्हा एकदा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.

उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदूरबार, धुळे, जळगाव आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळं या सर्व भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली आहे.

दरम्यान, रविवारी मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर वगळता सर्वच जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तसेच विदर्भातील गोंदिया आणि भंडारा वगळता सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाकडून केलं आहे.

वाचा ट्विट –


थोडक्यात बातम्या – 

अमिताभ बच्चन यांच्या पत्नीची भुमिका निभावलेल्या ‘या’ अभिनेत्रीचं निधन

“वाटलं तर तुम्ही जो बायडन यांनाही प्रचाराला आणा, शिवसेना घाबरत नाही”

टीम इंडीयाचा नवीन कोच ठरला, ‘या’ खेळाडूने स्विकारली जबाबदारी

‘वसुली सरकार भरती काढत नाही आणि काढली तर सावळा गोंधळ घालतं’; पडळकरांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More