बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यासाठी पुढचे चार दिवस महत्त्वाचे; राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात कमालिचा बदल पाहायला मिळत आहे. मान्सून (Mansoon) सहा दिवस आधीच अंदमानात दाखल झाला आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रातही मान्सून लवकरच दाखल होऊ शकतो.

सध्या वातावरणात झालेल्या बदलांमुळे राज्यात पुढचे चार दिवस पावसाची (Rain) शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांत राज्यातील काही भागात गडगडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दर्शवला आहे.

राज्यात 21 मे पर्यंत कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. राज्यातील काही भागात पाऊस हजेरी लावणार असून विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्याही काही भागात उष्णतेची लाट येणार आहे.

दरम्यान, बुधवारी सातारा, सांगली, कोल्हापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. तर गुरूवारी लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

थोडक्यात बातम्या-

सर्वसामान्यांना मोठा झटका! घरगुती गॅस पुन्हा महागला

राज कुंद्राला मोठा झटका, पुन्हा एकदा अटक होण्याची शक्यता

दीपाली सय्यद यांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं, म्हणाल्या…

‘या’ लोकांनी का घेऊ नये कोरोनाचा दुसरा बूस्टर डोस?, WHO ने दिली महत्त्वाची माहिती

“पुरून उरेल तुम्हाला… चित्रा वाघ म्हणतात मला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More