बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

मुंबई | राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून पाऊसाने दडी मारली आहे. ग्रामीण भागात पावसाअभावी पिकं करपताना दिसत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्याच्या सर्वच भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. भारतीय हवामान खात्याच्या मुंबई विभागाने आजपासून राज्यात वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

भारतीय हवामान खात्याचे हवामान अभ्यासक के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात पाऊस पडणार आहे. तसेच, राज्यातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह कोकणच्या भागात पाऊस पडणार आहे. मुंबईसह या भागात हवामान खात्यातर्फे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात आजपासून सोलापूर, जालना, बीड, औरंगाबाद, हिंगोली, परभणी या भागात आजपासून पाऊस हजेरी लावणार आहे. राज्यातील अनेक भागात गेल्या काही आठवड्यांपासून दमदार पावसाची प्रतिक्षा होती. पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणं भरलेली नाहीत. राज्यातील प्रमुख उजनी, जायकवाडी, विष्णूपुरी, गंगापूरसह अनेक मध्यम व लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत.

दरम्यान, येत्या काही दिवसात राज्यात सर्वदूर पाऊस बरसणार आहे. राज्यात 31 ऑगस्टला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर 1 सप्टेंबर रोजी पालघर या जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट आणि उर्वरित कोकणातील जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या –

ईडीच्या नोटीस नंतर अनिल परबांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…; पाहा व्हि़डीओ

“बिरोबाच्या बनात येऊन खोट्या शपथा घेणाऱ्याचं पार वाटोळं होतं”

देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात पुन्हा वाढ; वाचा आजची आकडेवारी

‘अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा’; काँग्रेसची मोठी मागणी

भारतीय खेळाडूंकडून लयलुट सुरूच; आणखी 3 पदकं भारताच्या खात्यात

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More