बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मान्सून संदर्भात मोठी अपडेट; राज्यात ‘या’ दिवशी होणार पावसाचं दमदार आगमन

मुंबई | महाराष्ट्रात 7 जून ते 8 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

भारतीय हवामान विभाग पुणे येथील हवामान विभागाचे प्रमुख अनुराग कश्यपी यांनी सांगितले की, अंदमानमध्ये 16 मेपर्यंत पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.

17 ते 21 मे दरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचवेळी उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात 26 मे पासून मान्सूनपूर्व पाऊस सुरू होईल. मान्सूनचा विषुववृत्त प्रवाह मजबूत आहे आणि तो वेळेवर पोहोचेल अशी आशा आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची नेमकी तारीख सांगणं शक्य नाही. मान्सूनची सुरुवात दरवर्षीच्या तारखांच्या आसपास असली तरी, महाराष्ट्राच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व पाऊस लवकरच सुरू होईल, असं अनुराग यांनी सांगितलंय.

थोडक्यात बातम्या- 

पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय निवृत्तीबाबत काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय! 

मोठी बातमी! नवाब मलिकांची प्रकृती खालावली; महत्त्वाची माहिती समोर

इंडियन टीमच्या ‘गब्बर’ची बॉलिवूडमध्ये एंट्री, शिखरच्या नव्या इनिंगला लवकरच सुरूवात होणार

मोठी बातमी! रूपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा दाखल

शिवसेनेनं दुसरा उमेदवार जाहीर करताच संभाजीराजेंनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More