बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईत सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यावर पसरली धुक्याची चादर, पाहा व्हिडिओ

मुंबई | मुंबईसह उपनगरामध्ये काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे रस्त्यावरची वर्दळही काही प्रमाणात कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र अनलॉक झाल्यानंतर मुंबईतील टोल नाक्यांवर लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून आलं होतं.

मुंबईत आज सकाळपासूनच बोरिवली, कांदिवली, अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, बांद्रा, कुर्ला, सायन, चेंबूर व दहिसर या भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर एक प्रकारे धुक्याची चादर पसरली आहे. यासंदर्भात एक व्हिडीओ एएनआय या वृत्तसंस्थेने ट्विट केला आहे.

सायन तसेच चेंबूर या भागांमध्ये रस्त्यावर धुक्याची चादर पसरल्याने चालकांना समोरचा रस्ता दिसण्यास अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरतीही धुक्याची चादर पसरल्याने चालक वाहन धीम्या गतीने चालवत आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये येत्या काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे.

महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर विविध भागांमध्ये सध्या पाऊस पडत आहे. तसेच यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. नाशिकसह मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये दोन दिवस मुसळधार पावसाचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात सर्वच भागांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

पाहा व्हिडीओ

थोडक्यात बातम्या

फडणवीसांच्या ‘त्या’ निर्णयाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचा नकार

‘या’ शहरात म्यूकरमायकोसिसचा कहर सुरूच; आतापर्यंत तब्बल 100 जणांचा मृत्यू

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून एका दिवसात तब्बल एवढ्या लाखांचा दंड वसूल

“मी सुपारीचोर आहे तर, निलेश राणेंच्या वडिलांची हऱ्या-नाऱ्याची गॅंग होती”

मुंबईत दररोज हजारांच्या आत नव्या कोरोनाबाधितांची होतेय नोंद, कोरोनामुक्तीचा दर वाढला

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More