बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हातातोंडाशी आलेला घास पावसाने नेला! मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान; पाहा व्हिडीओ

लातूर | सध्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टी झाल्याचं दिसतंय. राज्यभर जोरदार पाऊस पडल्यानं शेतकरी आणि शेतीचं प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. राज्यभरात मोठ्या प्रमाणात अतिमुसळधार पाऊस पिकांचे आणि रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भेटा गावात सतत चालू असणाऱ्या मोठ्या पावसानं शेती आणि रस्त्यांचे नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याची चिंता वाढली आहे. यातच जिल्ह्यातील अनेक गावात मोठ्या प्रमाणात रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्कही तुटला आहे. त्यातबरोबर इतर भागात देखील मोठं नुकसान होताना दिसत आहे.

लातूर जिल्ह्यात गेला काही दिवसांपासून खूप पाऊस पडत आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेलं सोयाबीन पीक पाण्यात वाहून जात आहे. लातूर जिल्ह्यात सोयाबीन पीक हे प्रमुख पीक आहे. यावरच शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे आता पावसानं शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ बसल्याचं दिसतंय.

दरम्यान, गुलाब चक्रीवादळाचा परिणाम हा राज्यावर होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच अतिवृष्टीचा धोका कायम आहे. गुलाब चक्रीवादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.

पाहा व्हिडीओ – 

थोडक्यात बातम्या – 

RSSवर टीका केल्याने जावेद अख्तर यांच्या अडचणीत वाढ; न्यायलयाने पाठवली नोटीस

“तुमचं आमचं स्वप्न पुर्ण करायचंय, 2024 ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल”

‘शेतकऱ्यांना मिळणार 5 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज’; हसन मुश्रीफ यांची घोषणा

पुढील 2 दिवस महत्त्वाचे! गुलाब चक्रीवादळामुळे ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

“मी खूप नशिबवान, कोरोनामुळे माझा जीव वाचला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More