बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 4 ते 5 दिवसात राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई | येत्या 4 ते 5 दिवसात राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाच्या काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 4 ते 5 दिवसात या भागात मेघगर्जनेसह पाऊस पडेल, असं सांगण्यात आलं आहे. तर एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

विदर्भाला पावसाचा सर्वात जास्त फटका बसू शकतो. विदर्भात येत्या काही दिवसात काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर आणि मध्य भारतावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झालं आहे. त्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. विदर्भात आणि मध्य महाराष्ट्राच्या किमान तापमानात वाढ झाल्याच दिसून येत आहे.

पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार पुणे, मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात हवामान ढगाळ राहण्याची शक्यता सांगितली होती. पुणे वेधशाळेने पावसाचा अंदाज वर्तवताना झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यावर हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या भागांमध्ये ढग साचण्याची शक्यता असल्याचं सांगितलं होतं.

थोडक्यात बातम्या-

किमान संकट काळात तरी राजकारण करू नका’; रोहित पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

काळजी घ्या! कोरोनाची ही नवी लक्षणं आली समोर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्या ‘या’ मागण्या

‘महाराष्ट्राच्या नावावर काय खपवताय?’; राजेश टोपे संतापले

‘क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?’; अमृता फडणवीसांची मुख्यमंत्र्यांवर टीका

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More