बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढचे तीन ते चार दिवस राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता!

मुंबई | येत्या तीन ते चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी ट्विट करून मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे.

मुंबईत ठाणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. ढगाळ वातावरण अजूनही असून हवामान विभागानं येत्या तीन ते चार दिवसांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. हवामान विभागानं जाहीर केलेल्या अलर्टनुसार, मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी उद्यापासून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यात ठिकाठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय. औरंगाबाद जालना अशा जिल्ह्यात तर पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड तसेच पूल वाहून गेल्याच्या घटना घडल्या आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यात 9 जून रोजी मुसळधार पाऊस झाला. या पासामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील जुई नदीला तुफान पूर आला होता. नदीला आलेल्या या पुरात चक्क पूल वाहून गेल्याची घटना घडली होती.

थोडक्यात बातम्या- 

“सर्व राजकीय नेत्यांच्या मुखी मराठा असला तरी मराठ्यांच्या हाती मात्र खराटाच”

महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; पाहा दिलासादायक आकडेवारी

‘कोरोनाच्या संकटातही मैदानात उतरण्यासाठी आतूर’; फिक्सिंगमध्ये सापडलेल्या ‘या’ खेळाडूवरील बंदी बीसीसीआयने हटवली

मन पिळवटून टाकणारी घटना! 15 दिवस फक्त पाणी पिऊन काढले दिवस

नियतीचा क्रुर डाव! माय-लेकीचा कोरोनाने केला घात, दोघींचा एकाचवेळी दशक्रिया विधी 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More