बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज्यातील ‘या’ भागात पुढील 4 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज!

मुंबई | 20 सप्टेंबरपासून पुढचे तीन ते चार दिवस विविध भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे. ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. काही भागांत मेघगर्जना व विजांच्या कडकडाटात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

पुढील दोन दिवसात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 20 आणि 21 सप्टेंबर रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

अंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा भीमा नदीत बुडून मृत्यू

“जबाबदार नागरिक घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये सदाचार आणि शिष्टाचार महत्वाचा”

दिव्या अग्रवाल ठरली बिग बॉस ओटीटीची विजेती; ट्रॉफीसह ‘इतके’ रुपये जिंकले

“मी वेळ देत नाही, ठाकरे सरकार कुठल्याही क्षणी पडेल”

‘नवज्योतसिंग सिद्धूंचे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांसोबत …’; अमरिंदर सिंग यांनी केले गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More