पुणे | जून महिना संपत आला तरी अजून राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. किंबहूना अजुन पावसाला सुरुवातच झाली नाही. शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे लागून आहेत. कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून तुरळक पाऊस पडतो आहे. पण अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही.
पावसासंदर्भात हवामान विभागाने महत्वाची बातमी दिली आहे. पुढील काही तासांत कोकण किनारपट्टीसह दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसळीकर यांनी ट्विट करुन ही बातमी दिली. आज रविवार दुपारी 4 वाजताची हवामान स्थितीची बातमी त्यांनी दिली. पालघर जिल्ह्यातील काही भाग, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात पुढील काही तासांत मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. कोकण किनारपट्टीसह उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातही पावसाचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सातार जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. उपग्रह चित्रानुसार मराठवाडा आणि विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक चित्र आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
एकनाथ शिंदे दारुच्या नशेत?; ‘तो’ व्हिडीओ सोशल मीडियावर होतोय व्हायरल
‘आता तर ते दिसतही नाहीत’; बंडाची आठवण करून देत आदित्य ठाकरेंचा राज ठाकरेंना टोला
“देवा लवकर आटप रे सगळं, हॉटेलचं बिल वाढतंय”
“…पण त्यांनी शिवसैनिकांच्या आईवर हात घातला आहे, ते कसे शांत राहातील”
Comments are closed.