बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

3 जिल्ह्यात अतिवृष्टी तर कोकणातल्या या जिल्ह्यात ढगफुटीची शक्यता, घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान!

मुंबई | हवामान खात्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येत्या चार तासांमध्ये याठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस बरसण्याची शक्यता आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगफुटीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे याठिकाणी 200 मिमीपेक्षा जास्त पाऊस बरसण्याचा अंदाज आहे. हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग परिसरात आपातकालीन प्रसंगाचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.

मुंबई आणि उपनगरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे सखल भागांमध्य पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा ठप्प होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.  येत्या तीन ते चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. पुणे, सातारा आणि कोल्हापूर या परिसरात शनिवारी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे

थोडक्यात बातम्या- 

“भाजपमध्ये गेलेले पुन्हा पक्षात येण्यास इच्छुक, माझ्याकडे काँग्रेसमध्ये येणाऱ्यांची मोठी यादी”

संजय राऊतांच्याच मार्गदर्शनाखाली आमची वाटचाल सुरु- नाना पटोले

‘नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही’; नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना दम

छोरी धाकड है! खुल्या कुस्ती स्पर्धेत विनेश फोगटची सुवर्णपदकाला गवसणी

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More