बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ सहा जिल्ह्यांना अलर्ट जारी

नागपूर | गेल्या 5 दिवसांपासून राज्यभर पावसाने थैमान घातलं आहे. मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. तर कोकणात देखील पावसाचा जोर वाढलेला दिसत आहे. त्यातच आता मराठवाड्यातील जिल्ह्यांना अलर्ट  जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने राज्यात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कालपासून मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर आजही मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

मराठवाड्यातील बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना या 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर लातूर आणि उस्मानाबादला देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टीचा देखील इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्यानं प्रशासन देखील सतर्क झालं आहे. त्यामुळे प्रशासनाने मराठवाड्यातील जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर 9 सप्टेंबरनंतर राज्यातील पाऊस ओसरण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या-

महात्मा गांधींच्या टोपीवरून नवा वाद; भाजप नेत्याने केला ‘हा’ दावा

माझ्या मुलाने सेक्स करावा, ड्रग्सही घ्यावेत- शाहरुख खान

“मोहन भागवत कुठले डाॅक्टर हे तपासावं लागेल”

“कोरोना महाराष्ट्र सरकारचा व्हायरस म्हणून जगात ओळखला जाईल”

“खुशाल 50 कोटींचा दावा करा, मी घाबरत नाही, माझे मायबाप खंडोबा आणि बिरोबा”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More