बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उद्यापासून राज्यात सलग 3 दिवस जोरदार पाऊस; ‘या’ भागांसाठी अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यात पावसाने दडी मारली होती. मात्र गेल्या 3 दिवसांपासून राज्यभर पावसाला सुरूवात झाली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चक्रीवादळाची स्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे आता पुढील सलग दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या चक्रीवादळाचा परिणाम मुंबई, कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि राज्याच्या अनेक भागात दिसून येत आहे. त्यामुळे आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यभर पावसाची शक्यता कुलाबातील प्रादेशिक हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड या 4 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पुणे, नाशिक, सातारा, सोलापूर, नंदूरबार, धुळे आणि जळगाव या भागात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाशिम, यवतमाळ, अमरावती, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होताना दिसत आहे.

दरम्यान, मराठवाड्यात अनेक पावसाने जोरदार हजेरी लावली असल्यामुळे मराठवाड्यातील धरणं 100 टक्के भरली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असल्याचं दिसून येतंय.

थोडक्यात बातम्या-

“संजय राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी”

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नाना पटोले

ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणतात…

“दोन ग्रॅम हेरॉइनवर नंगा नाच केला मात्र 20 हजार कोटींचे हेरॉइन सापडलं तर गप्प का?”

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवविवाहितेने केलं असं काही की नवरदेवाने गाठलं थेट पोलीस स्टेशन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More