बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुढील 4-5 दिवस ‘या’ भागांत मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा इशारा

मुंबई | राज्यांत पुन्हा एकदा मुसळधार पावसानं थैमान घातलं आहे. येत्या 4-5 दिवसांत परतीच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्यानं सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 4-5 दिवसांतही मुसळधार पावसाची शक्यता वर्तण्यात आली आहे.

सध्या बंगालच्या उपसागरात चक्रीय वादळ सक्रिय झालं आहे. त्यामुळे आता जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुढील 4-5 दिवस राज्यांत काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. विजा चमकताना कृपया बाहेरचे काम टाळा, त्या वेळी घराबाहेर पडू नका, त्यात जीवाला धोका असू शकतो. शक्यतो अशा प्रकारचे तीव्र हवामान दुपारनंतर ‌संध्याकाळी व रात्री पर्यंत असू शकते, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यातं पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, याच आठवड्यात परतीचा पाऊस येण्याची शक्यता आहे. मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला आहे. हवामान खात्यानुसार यंदा पाऊस चांगल्या प्रमाणात झाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

NCBच्या क्रुझ पार्टीवरील कारवाईचं गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून स्वागत, म्हणाले…

“तालिबानी सरकार आणि योगी सरकार यांच्यात फक्त दाढीचा फरक”

‘आता मंत्रालयातसुद्धा जायची वेळ झाली’, मनसेच्या मुख्यमंत्र्यांना चारोळीतून कोपरखळ्या

जम्मू-काश्मिरमध्ये दोन तासात तीन दहशतवादी हल्ले; तब्बल एवढे लोक मृत्युमुखी!

रामायणात रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी काळाच्या पडद्याआड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More