बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अवकाळी पावसावर मरीआई बसली, ‘या’ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान

कोल्हापूर | राज्यात थंडीची लाट सुरु आहे. मात्र आता कडाक्याची थंडी ओसरत असून अनेक ठिकाणी पावसानं जोर धरला आहे. ऐन थंडीतही पावसानं (Rain) हजेरी लावल्यामुळे नागरिकही चिंतेत होते. अनेक ठिकाणी या अवकाळी पावसामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे.

बुधवारपासून कोल्हापूरमध्येही पावसानं चांगलाच जोर धरला आहे. या अवकाळी कोसळणाऱ्या पावसामुळे कोल्हापूरमधे जनजीवन विस्कळीत होत असल्याचं चित्र आहे. याशिवाय शेतकऱ्यांचंही भरपूर नुकसान होत आहे.

बुधवारी कोल्हापूरमध्ये (Kolhapur) अर्धा तास जोरदार पाऊस झाला. या पावसामुळं नागरिकांची मोठ्या प्रमाणावर धावपळ झालेली पहायला मिळाली. पावसाचा फटका साखर कारखाने, गुऱ्हाळघरांना बसला असून कापणी केलेले भात अनेक ठिकाणी भिजले.

दरम्यान, ऐन थंडीतही काही ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताना पहायला मिळत आहे. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर ऐन थंडीतही पावसानं काही ठिकाणी हजेरी लावली आहे. अशा अवकाळी पावसामुळे नागरिकही चिेंतेत आहे.

थोडक्यात बातम्या – 

सोनं ‘इतक्या’ रुपयांनी महागलं, वाचा आजचे ताजे दर

पहिली ते सातवीच्या शाळांचीही घंटा वाजणार?, टास्क फोर्सने दिली ‘ही’ महत्वाची माहिती

आता विद्यार्थ्यांना महानगरपालिका देणार 51 हजार रुपये, वाचा सविस्तर

राष्ट्रवादीत मोठी खळबळ! ‘या’ आमदारानी दिला पदाचा राजीनामा

आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या ‘या’ व्यक्तीला अटक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More