बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

उत्तराखंडमध्ये अतिवृष्टीने हाहाकार! तब्बल 46 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

नवी दिल्ली | उत्तराखंडमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्तहानी झाली आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत घडलेल्या घटनांमध्ये तब्बल 46 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे. याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी पुरग्रस्त भागाचा आढावा घेतला.

उत्तराखंडमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 11 जण बेपत्ता आहेत. काही जण जखमी देखील झाले आहेत. राज्यातील एकूण मृतांचा आकडा 46 वर गेला आहे. तसेच आता पाऊस कमी झाल्याचं दिसत आहे. पुन्हा सर्व सुरळीत होण्यासाठी वेळ लागणार आहे. रस्ते वाहून गेले आहेत, तर काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. याचा फटका गावांना बसला आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

पावसामुळे मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना 4 लाखाची मदत जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर बचाव कार्य आणि दुरूस्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने 10 कोटीचा निधी मंंजूर करण्यात आला आहे. ठिकठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी आणण्याचं काम जलद गतीने सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

दरम्यान, अलिकडेच केरळ राज्यातील सात जिल्हात पावसानं रौद्ररूप धारण केलं होतं. मुसळधार पावसामुळे केरळमध्येही जवळपास 26 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. येत्या 24 तासात ही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे केरळात महापूरचं संंकंट येण्याची चिन्हे दिसत आहे. उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने ठिकठिकाणी बचाव पथकांकडून वेगाने काम सुरू आहे.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोंदीची का होतेय जेम्स बाँडसोबत तुलना?

सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेलाच्या दरात घट; सर्वसामान्यांना दिलासा

“महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही याचा लवकरच निर्णय घेऊ”

भ्रष्टाचार कितीही मोठा असला तरी केंद्र सरकार त्याची पाळेमुळे खणून काढणार – पंतप्रधान नरेंद्र मोदी

“राज्यात कायद्याचा धाक राहिला नाही! तु मोठी झाली का पाहायचं म्हणत जन्मदात्या बापाने…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More