बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा; घराच्या बाहेर पडत असाल तर सावधान

मुंबई | मुंबईसह अन्य जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन तासांत मुंबई, ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तिन्ही जिल्ह्यांना हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई शहर, मुंबई उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांत पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. तसेच रस्त्यांवर सुद्धा पाणीच पाणी पहायला मिळत आहे.

मुंबईत चेंबूर, कुर्ला, नेहरू नगर, सायन, वडाळा, वांद्रे, सांताक्रुझ परिसरात रस्त्यांवर पाणी आल्याचं दिसून येत आहे. अशीच परिस्थिती ठाणे, नवी मुंबईतील सखल भागांत निर्माण झाली आहे. पावसाचा हा जोर अद्यापही कमी होत नाहीये तसेच दिवसभर हा पाऊस अशाच प्रकारे बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“शिवसेनेने काँग्रेसशी हातमिळवणी करून आपले देव, धर्म बासणात गुंडाळलेत”

शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट; विविध विषयांवर अर्धा तास चर्चा

“…तर अशा लोकांवर गंगामाईचा कोप झाल्याशिवाय राहणार नाही”

“जेव्हा लोक मला शिव्या देत होते, तेव्हा पवार साहेबांनी मला विरोधी पक्षनेता केलं”

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी मोठी बातमी!

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More