बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यात मुसळधार पाऊस! राज्यातील ‘या’ 6 जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर आज पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणमध्ये मुसळधार पाऊस पडताना दिसत आहे. दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने विश्रांती घेतली होती. आता पुण्यासह राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. त्यावर आता हवामान खात्यानं पुण्यासाठी अलर्ट जाहीर केला आहे.

उद्यापासून पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुण्यात आजपासून पुढचे 3 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर 13 आणि 14 तारखेला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकण आणि घाट परिसरात जोरजार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात 30 ते 40 प्रतितास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यामुळे आता शेतमालाची नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या-

“काही झालं तरी 2024ला काँग्रेसचाच पंतप्रधान होणार”

आधी पाॅर्न वेबसाईट त्यानंतर…; एकतर्फी प्रेमातून तरुणाने केल्या धक्कादायक गोष्टी!

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावर ठरते उपायकारक???; कोर्टाने दिला निकाल

सीरम इन्स्टिट्युटला केंद्राची नवीन ऑर्डर; वर्षाच्या शेवटी मिळणार ‘इतक्या’ कोटींच्या लशींचा डोस

मोठी बातमी! पाचव्या कसोटी सामन्यावर कोरोनाचे सावट, अखेरचा सामना रद्द

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More