माजी खासदाराचा भाजपला रामराम; आता शिंदेंच्या उमेदवाराला देणार आव्हान

Heena Gavit resigns from BJP

BJP | राज्यात विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काल, उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे अनेक ठिकाणी नाट्यमय चित्र दिसून आलं. तर, अजूनही अनेक पक्षात नेत्यांच्या आउटगोइंग आणि इनकमिंग सुरू असल्याचं दिसून येतंय. अशात भाजपला मोठा धक्का बसणारी बातमी समोर आली आहे. नंदुरबारमध्ये भाजपला मोठा हादरा बसला आहे. येथे भाजपच्या माजी खासदाराने पक्षाला रामराम ठोकला आहे. (BJP)

भाजपाच्या माजी खासदार डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांनी भाजप पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्या अक्कलकुवा आक्रनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत आहेत. हा मतदारसंघ भाजपला सुटावा यासाठी त्या आग्रही होत्या. मात्र, ही जागा शिंदे गटाकडे गेली. नंदुरबार विधानसभा मतदारसंघात शिंदे गट विरोधात काम करत असल्याने आपण अपक्ष अर्ज भरला,असं हिना गावित म्हणाल्या आहेत.

हिना गावित यांचा भाजपला रामराम

अपक्ष उमेदवारी करत असल्यामुळे पक्षाला अडचण होऊ नये यासाठी मी भाजपचा राजीनामा देत आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय. “मतदारसंघात मी खासदार असताना अनेक कामे केली आहेत. मी केलेल्या विकास कामांचा फायदा मला मतदार मतदानाच्या स्वरूपात देणार, मी निवडणूक जिंकणार” असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. (BJP)

ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हीना गावित यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. यासोबतच येथे शिंदे गटाचं देखील टेंशन वाढलं आहे. अक्कलकुवा विधानसभेसाठी शिंदे यांच्या शिवसेनाकडून विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण गावित यांनी या मतदारसंघात आपली भूमिका मांडत भाजपला रामराम ठोकला आहे. आता त्या अपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहेत. याचा फटका शिंदे यांच्या उमेदवाराला बसणार आहे.

अक्कलकुवामध्ये शिंदे गटाची चिंता वाढली

शिंदे गट वारंवार भाजपाच्या विरोधात काम करत असल्यामुळे मी शिंदे गटाच्या विरोधात उमेदवारी करत आहे, असं हीना गावित म्हणाल्या आहेत. त्यांनी येथे प्रचाराला देखील जोरदार सुरुवात केली आहे. याचा फटका आता शिंदे गटासह महायुतीला बसणार आहे.

दरम्यान, हीना गावित या पेशाने डॉक्टर असून त्यांनी एमबीबीएस आणि एमडीची पदवी घेतली आहे.2014 साली लोकसभेवर त्या पहिल्यांदा निवडून गेल्या होत्या. त्या लोकसभेवर निवडून गेलेल्या सर्वाधिक तरुण खासदार ठरल्या होत्या. आता त्यांनी विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. (BJP)

News Title –  Heena Gavit resigns from BJP

महत्त्वाच्या बातम्या-

गुड न्यूज! दिवाळी सरताच सोनं झालं स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

मोदी-शाहंची तळी राज ठाकरे उचलतायेत; ‘या’ नेत्याची टीका

सलमान खानचं टेन्शन वाढलं; जिवंत रहायचं असेल तर…

फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेबाबत मोठा बदल, आता..

फडणवीसांनी ईडीचा डाव लावताच गोपाळरावांचा आव, ताव आणि भाव कोसळला!

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .