देश

तात्काळ मदत मिळाली नाही तर 50 हजार लोकांचा बळी जाईल!

तिरुवनंतपुरम | केरळमध्ये पावसाने मांडलेल्या थैमानामुळे तब्बल 50 हजार जणांचा बळी जाऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर कार्यवाही करा, असं आवाहन केरळमधील एका नेत्याने केले आहे. त्यांनी टीव्ही चॅनेलवरून हे आवाहन केलं आहे. 

सजी चेरीयन असं या आमदाराचं नाव आहे. जवळपास 10 हजार लोक पुरामध्ये अडकल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांना तात्काळ मदतीची गरज आहे. लष्काराची मदत लगेच मिळाली नाही तर फक्त चेंगनूरमध्ये बळींची संख्या 50 हजार इतकी होऊ शकते असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, या भागात परिस्थिती एवढी भयानक आहे की येथे फक्त एअरलिफ्टनेच मदत करता येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या-

-अटलजींना श्रद्धांजली वाहण्यास नकार देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेवकावर कारवाई

-स्फोटकं सापडलेल्या वैभव राऊतच्या समर्थनार्थ नालासोपाऱ्यात भव्य मोर्चा

-धक्कादायक! छेडछाडीला विरोध केल्यामुळे दहावीतील मुलीला पेटवलं

-सलमानच्या ‘भारत’चा टीझर प्रदर्शित, पहा टीझर

-पुढच्या निवडणुकीत माझा बळी देऊ नका; आमदार सतेज पाटलांची कार्यकर्त्यांना विंनती

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या