बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

मुंबई | महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे आलेल्या महापुरात मोठं नुकसान झालं आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुराचा फार मोठा फटका बसल्यानं अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. तर छोट्या नद्या, नाल्यांवर असणारे फुल देखील वाहून गेले आहेत. त्यामुळे नागरिकांना खूप संकटांचा सामना करावा लागत आहे. अशातच पूरग्रस्तांसाठी मास्टरशेफ संजीव कपूर यांनी मदतीचा हात पुढे केला असल्याचं पाहायाला मिळत आहे.

महाराष्ट्रातील चिपळूण आणि महाड भागात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे या भागतील लोकांना अन्नपुरवठा करण्याचं काम मास्टरशेफ संजीव कंपूर करणार आहे. अन्न पुरवण्यासाठी मास्टरशेफ संजीव कंपूर यांनी शेफ जोस अँड्रेस आणि ताज हॉटेल्स यांनी स्थापन केलेल्या वर्ल्ड सेंट्रल किचनसोबत भागीदारी करत हा पुढाकार घेतला आहे.

या उपक्रमाचा भाग म्हणून संजीव कपूरची टीम 30 तारखेपासून पूरग्रस्तांना दररोज एकूण 15000 थाळ्या पुरवणार आहे. या उपक्रमाविषयी बोलताना या पुढाकारातून आम्ही पूरग्रस्त कुटुंबियांच्या मूलभूत पौष्टिक गरजा भागवण्यासाठी चांगल्या दर्जाचं अन्न पुरवणार आहे. या भागातील तसेच इतरही पूरग्रस्तांना अन्न पुरवणं हेच आमचे उद्दिष्ट आहे, असं संजीव कपूर यांनी म्हटलं.

दरम्यान, पूरग्रस्त भागातील लोकांना मूलभूत पोषणाच्या गरजा पुरवण्यासाठी अन्नदेखील मिळत नाही. माणुसकीच्या दिशेने टाकलेलं एक लहानसे पाऊल अनेक लोकांच्या जीवनात बदल घडवू शकेल, अशी आम्हाला खात्री आहे, असंही संजीव यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या –  

चिंताजनक! कोरोनाच्या बदलत्या रूपानं लक्षणातही होतोय बदल

कमलप्रीत कौरनं रचला इतिहास; फायनलमध्ये धडक

“जनसामान्यांचं निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता गमावला”

कोरोनानंतर नोरोव्हायरसचा धुमाकूळ; इंग्लडमध्ये अलर्ट जारी

पुण्यातील ‘फुकट बिर्याणी’ ऑर्डर प्रकरणात मोठा ट्विस्ट!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More