बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आर्यन खान तुरूंगात पण सलमानच्या अडचणी वाढल्या; वाचा नेमकं कारण काय

मुंबई | बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान मागील काही दिवसांपासून मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरणात तुरूंगात आहे. आपल्या मुलाच्या सुटकेसाठी शाहरूख खान मोठे प्रयत्न करताना दिसत आहे. आर्यन खानला आज न्यायालयानं 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अशातच आता आर्यन खानमुळे भाईजान सलमानच्या अडचणीत वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

शाहरूख खाननं सध्या आपल्या आगामी सर्व चित्रपटांची शुटींग थांबवली आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम आता बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर होताना दिसत आहे. सलमान खानच्या ‘टायगर 3’ च्या चित्रपटाच्या परिणाम झाल्याची माहिती आता समोर आली आहे. सलमान खानच्या टायगर 3 चं काही शुटींग मुंबईमध्ये होणार होतं. त्यासाठी शुटींगचे सेट देखील उभारण्यात आले होते. सलमान खानला पठाणमध्ये एक कॅमिओ करायचा होता. पण आता सलमान खान देखील शुट करू शकत नाही. त्यामुळं सलमानचा चित्रपट रखडला आहे.

शाहरूख खानच्या पठाण चित्रपटानंतर सलमानचा टायगर 3 प्रदर्शित होणार आहे. सलमान खान शाहरूख खानच्या पठाण मध्ये कॅमिओ करणार आहे. पठाण चित्रपटामध्ये सलमान खानचा टायगर 3 चित्रपटातील लूक दाखवून चित्रपटाची उत्सुकता निर्माण करण्यात येणार होती.

दरम्यान, सलमान आणि शाहरूखचे दोन्ही चित्रपट यशराज प्रॉडक्शनच्या बॅनरखाली तयार होत आहेत. सलमानच्या टायगर 3 मध्ये कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी असणार आहेत.

थोडक्यात बातम्या –

तारीख पे तारीख! टीईटीची परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलली; विद्यार्थी संभ्रमात

आर्यन खानला फक्त हिंदू-मुस्लीम वादासाठीच अटक केली – नाना पटोले

वर्ल्ड चॅम्पियन! डीजे ब्रावोच्या गाण्यावर थिरकले कॅरेबियन खेळाडू; पाहा व्हिडीओ

“कदाचित गांज्याची नशा उतरली नसल्यानं संजय राऊत…”

“समीर वानखेडेचा बाप बोगस होता, तुला तुरूंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More