Top News देश

…यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होतं- हेमा मालिनी

नवी दिल्ली | केंद्राच्या नव्या कृषी काद्याविरोधात दिल्लीत गेल्या दीड महिन्यापासून आंदोलन चालू आहे. सर्वोच्च न्यायालयानं नव्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील आदेशापर्यंत स्थगिती आणली आहे.

यासंदर्भात अहवाल सादर करण्यासाठी एक समितीही स्थापन केली आहे. मात्र या समितीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाच माहित नाही की त्यांना काय हवं आहे. नव्या कृषी कायद्यांबाबत समस्या काय आहेत हे देखील त्यांना माहित नाही यावरून शेतकरी कोणाच्यातरी सांगण्यावरून आंदोलनासाठी बसले हे स्पष्ट होत असल्याचं हेमा मालिनी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, शेतकरी आणि सरकार यांच्यामध्ये अनेक बैठका पार पडल्या आहेत. मात्र एकाही बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

 

थोडक्यात बातम्या-

महापालिकेकडून आरोप होत असताना सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट, चर्चांणा उधाण!

“ब्लॅकमेलशिवाय मुंडे आणखी काय बोलणार?, पण मी मरेपर्यंत लढेन

हिंदू धर्मात दोन पत्नी अमान्य असतील तर भाजपचे नेतेही टेन्शनमध्ये येतील- काँग्रेस

पहिल्या टप्प्यात 55 टक्के लाभार्थींना मिळणार लस!

मुंबईतील शाळा, कॉलेजची दारं जानेवारीच्या ‘या’ तारखेला होणार खुली???

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या