Hema Malini | सुमारे ५०-६० वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या जोड्यांपैकी, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) या जोडीने प्रेक्षकांची मने जिंकली. ‘बागबान’ हा चित्रपट, वृद्ध आई-वडिलांना त्यांच्या मुलांकडून मिळणाऱ्या वागणुकीवर आधारित होता. सुरुवातीला चित्रपटाला यश मिळाले नव्हते, हे दिवंगत दिग्दर्शक रवी चोप्रा यांच्या पत्नी रेणुका चोप्रा (Renu Chopra) यांनी सांगितले.
हेमा मालिनीची ब्लाउजविषयी विशेष मागणी-
रेणुका चोप्रा यांनी अलीकडील मुलाखतीत ‘बागबान’ चित्रपटाच्या पडद्यामागील अनेक गोष्टी सांगितल्या. त्यांनी सांगितले की, हेमा मालिनी यांनी चित्रपटातील एका दृश्यासाठी खास घट्ट ब्लाउज शिवून मागितला होता.
एका मुलाखतीदरम्यान, रेणुका यांनी सांगितले की, हेमा मालिनीला एका दृश्यामध्ये, जिथे अमिताभ बच्चन यांना तिचा ब्लाउज बांधायचा होता, तिथे चेहऱ्यावर विशिष्ट हावभाव हवे होते. त्यासाठी त्यांनी ब्लाउज अधिक घट्ट शिवण्यास सांगितले. जेणेकरून त्या दृश्यातील भावना योग्य पद्धतीने व्यक्त होतील.
रेणुका म्हणाल्या, “एक दृश्य होते, ज्यात हेमा आरशासमोर उभी राहून तयार होत असते आणि राज (Raj)तिच्या मागे उभा असतो. राज तिला पाहून ‘वाह’ म्हणतो. हेमा मालिनीने मला तिचा ब्लाउज थोडा घट्ट शिवायला सांगितला, जेणेकरून अमिताभ जेव्हा तो बांधायला येतील, तेव्हा तिला अपेक्षित असलेला लूक मिळू शकेल. ती म्हणाली, ‘लग्नाला इतकी वर्षे झाल्यावरही, त्याच्या स्पर्शाने मला हवा असलेला लूक येईल.’ ती खऱ्या आयुष्यात खूप रोमँटिक आहे.”
तब्बूपेक्षा हेमा मालिनीला मिळाली भूमिका
रेणुका चोप्रा यांनी त्याच मुलाखतीत सांगितले की, पूजा मल्होत्राच्या भूमिकेसाठी हेमा मालिनी पहिली निवड नव्हती. सुरुवातीला ही भूमिका तब्बू (Tabu) हिला ऑफर करण्यात आली होती.
रेणुकाने सांगितले की, तब्बूला चित्रपटाची कथा आवडली, पण तिने ही भूमिका नाकारली. कारण वयाच्या 36 व्या वर्षी चार मुलांच्या आईची भूमिका साकारायला ती तयार नव्हती. तब्बूने चित्रपट नाकारल्यानंतर तिच्या काकूने तिला ओरडून सांगितले, “तू हा चित्रपट का नाकारलास?” असे म्हणून रागावले होते. रेणुकाने असेही सांगितले की, ‘बागबान’ चित्रपटाला सुरुवातीच्या काळात वितरक मिळवणे खूप कठीण होते, कारण अनेकांना हा चित्रपट जुन्या धाटणीचा वाटला. पहिल्या चार दिवसांत चित्रपटाने फारशी कमाई केली नाही, पण नंतर मात्र चित्रपटगृहांमध्ये गर्दी वाढली. (Hema Malini)
Title : Hema Malini Baghban Role Untold Story