Top News महाराष्ट्र मुंबई

‘माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!’; अभिनेता हेमंत ढोमेचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा

मुंबई | दिल्लीमध्ये केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी गेल्या 12 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांनी 8 डिसेंबर म्हणजेच आज भारत बंदची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर अभिनेता हेमंत ढोमेने कृषी आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

बळीराजा उद्वीग्न झालाय, तो ज्याने समाधानी होईल ते व्हायला हवं! पोशिंद्याच्या लढ्यात पक्ष, राजकारण या पलिकडे सारासार विचार होणं गरजेचं आहे! त्याला वारंवार रस्त्यावर उतरावं लागणार नाही यासाठी योजना हव्यात! माझ्या बापाला माझा पाठींबा असणारच!, असं हेमंत ढोमेने म्हटलं आहे.

हेमंतने शेतकऱ्यांना आंदोलनाचे समर्थन करण्याबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने #Isupportfarmerprotest #शेतकऱ्यांचालढा असे हॅशटॅग वापरले आहेत.

दरम्यान, आजच्या भारत बंदला प्रतिसाद येत आहे. कुठे रेल्वे अडवण्यात आली तर दुपारनंतर मुंबईत येणाऱ्या दुधाच्या गाड्या अडवल्या जाणार आहेत. तर काही ठिकाणी बाजारपेठा बंद ठेवून भारत बंदला प्रतिसाद देण्यात आला आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

“शेतकऱ्यांचा नावाखाली राजकारण करणाऱ्यांचा आजचा बंद आहे पण… “

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता कमीच- राजेश टोपे

डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबावर ओढावलं आणखी एक संकट

“शेतकऱ्यांनी तुुम्हाला विश्वासाने परत सत्ता दिली मात्र बळीराजाच्या विश्वासाला केंद्राने तडा दिला”

पालघर साधू हत्याकांड प्रकरणातील 47 आरोपींना जामीन मंजूर!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या