बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘तिचीच चूक असणार’; हेमांगी कवीची मन हेलावून टाकणारी पोस्ट

मुंबई | आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांचे मन जिंकून घेणारी अभिनेत्री म्हणजेच हेमांगी कवी-धुमाळ. हेमांगीनं मराठी-हिंदी मालिका, नाटक, आणि चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशातच हेमांगी सोशल मीडियावर तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरत असते. आता पुन्हा एकदा तिच्या पोस्टनं सोशल मीडियावर लक्ष वेधलं आहे.

नुकतंच झालेल्या साकीनाका प्रकरणानंतर संपूर्ण देश पेटून उठला आहे. यावर हेमांगीनं आता एक पोस्ट शेअर केली आहे. तिच्या पोस्टनं सोशल मीडियावर सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. हेमांगीनं महिला सुरक्षेविषयी आपलं परखड मत मांडलं आहे.

हेमांगीनं पोस्टमध्ये म्हटलं की, आणखी एक! तिचीच चूक असणार! तिचे कपडे चुकले असतील! एवढ्या रात्री ती काय करत होती? एकटी होती की कुणासोबत होती? तिची जात काय, धर्म काय, कुठे काम करत होती? किती कमवत होती? लग्न झालेली होती, सिंगल होती, डिवाॅर्स होती, मुलं बाळं किती? ती मुंबईची की आणखी कुठली! सगळं सगळं तीचंच चुकलं असणार! चला आता आपण तिलाच आणखीन घाबरवून ठेऊया! बाकी त्याला कसलंच बंधन नको, सगळी सूट देऊया! काय?

दरम्यान, हेमांगी कवीच्या या पोस्टवर सध्या अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. अनेकांनी तिच्या या पोस्टचं कौतुक केलं आहे तर अनेकांनी तिला ट्रोलही केलं आहे.

थोडक्यात बातम्या –  

“हवेत गोळीबार करू नका, चंद्रकांत पाटलांना अफवा पसरवण्याची सवय”

साकीनाका प्रकरणानंतर नीलम गोऱ्हे आक्रमक; मुख्यमंत्र्यांना दिले ‘हे’ सल्ले

ठाण्यात इमारतीचा स्लॅब कोसळून दोन ठार; एकजण गंभीर जखमी

परभणीत काळीज पिळवटून टाकणारा अपघात; मॉर्निंग वॉकला गेलेल्या चौघांना ट्रकनं चिरडलं

टार्गेट पूर्ण करा, गळ्यात फुलांची माळ पडेल नाहीतर…- नितीन गडकरी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More