बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हेमांगीला ‘त्या’ व्हिडीओवरून ट्रोल करणाऱ्या लोकांवर भडकल्या चित्रा वाघ, म्हणाल्या…

मुंबई | अभिनेत्री हेमांगी कवी नेहमीच सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती नेहमी आपलं परखड मत मांडताना दिसते. सध्या ती ‘बाई, बुब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. हेमांगीच्या या पोस्टला अनेक कलाकारांकडून पाठिंबा मिळाला. अशातच आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

अंतर्वस्त्रांवरून महिलांना ट्रोल करणाऱ्यांसाठी हेमांगीने ही पोस्ट लिहिली असून मला स्तन आहेत. त्याला स्तनाग्रेही आहेत अगदी पुरुषांसारखी! जसे चालताना माझे हातपाय हलतात तसचे काम करताना माझे स्तन हलतात. कारण मी सस्तन प्राणी आहे. मादी आहे! ज्यांचे हलत नाहीत अशांना माझा त्रिवार सलाम. आता मी घरात, बाहेर, सोशल मीडियावर अंर्तवस्त्र (ब्रा) घालायची की, नाही ही माझी पसंत आहे, असं म्हणत हेमांगीनं ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यांना चांगलंच सडेतोड उत्तर दिलं.

आता हेमांगीला अंतर्वस्त्रांवरून ट्रोल करणाऱ्यांसाठी चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. एका पोळ्या लाटण्याच्या पोस्टवर नजर न टाकता नको त्या गोष्टींकडे बारीक लक्ष देणे, अश्लील कमेंट करणे, लोकांनी सगळ्या पातळ्या सोडल्या आहेत, असं सांगत लोकांची नजर सुधारण्याचे नावच घेत नसल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

दरम्यान, हेमांगीला ट्रोल करणाऱ्या लोकांना तिचं सामाजिक विषयावर परखडपणे बोलणं, तिचे अभिनय कौशल्य का दिसत नाही?, त्याचबरोबर आपण बाईच्या दिसण्यावर का चर्चा करतोय?, कधी बाईच्या असण्यावर काही चर्चा करणार आहोत की नाही?, बायकांना किती दिवस बंधनात ठेवणार?, तिने केलेल्या कामावर कधी चर्चा होणार आहे की नाही?, असंही चित्रा वाघ यांनी यावेळी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“माझ्या पक्षाचं काम करताना कोणाला राग येत असेल तर मला फरक पडत नाही”

उद्धवजी, आषाढी एकादशीला तुम्ही शरद पवारांनाच अभिषेक करा- अतुल भातखळकर

मी राजकियदृष्ट्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात आहे- उद्धव ठाकरे

प्रशांत किशोर यांनी घेतली राहुल गांधींची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

…त्यामुळे पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाहीत- चंद्रकांत पाटील

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More