मुंबई | हरहुन्नरी कलाकार आणि जगाच्या पाठीवर आपल्या अभिनयाने आपले लाखो चाहते निर्माण करणारे अभिनेते इरफान खान यांचं आज निधन झालं. वयाच्या 54 व्या वर्षी मुंबईच्या कोकिलाबेन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध क्षेत्रातले मान्यवार मंडळी त्यांच्याप्रती आदरांजली व्यक्त करत आहेत. सारी चित्रपटसृष्टी त्यांच्या जाण्याने पोरकी झाली आहे. मराठी अभिनेता हेमंत ढोमेने देखील आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
इरफान तू आमच्यामधून गेला नाहीयेस. तू आमच्यासाठी कायमच जिवंत राहशील, अशा भावना हेमंतने व्यक्त केल्या आहेत. इरफानच्या जाण्याने सगळ्या चित्रपटसृष्टीला अतिव दु:ख झालं आहे. हेमंतने देखील इरफानप्रति आपली आदरांजली व्यक्त करताना तुझ्या कामाने तू काय जिवंत राहशील, असे उद्गार काढले आहेत.
इरफान खान यांना मराठी चित्रपटसृष्टीविषयी विशेष स्नेह होता. त्यांची मराठी चित्रपटातील कलाकारांशी नाळ होती. प्रादेशिक चित्रपटांविषयी त्यांचा अभ्यास होता. आज ते गेल्यानंतर मराठी चित्रपट अभिनेते जयवंत वाडकर, सुमित राघवन तसंच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, पल्लवी जोशी यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देत आपण फार मोठ्या आणि तितक्याच साध्या माणसाला मुकल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
इरफान यांनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने लाखो प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं. त्यांच्या करारी डोळ्यांनी आणि ताकदीच्या संवादफेकीने त्यांचा प्रत्येक शब्द प्रेक्षकांच्या काळजात आरपार घुसायचा. आज इरफान यांच्या जाण्यानंतर अनेकांना आपल्या भावना व्यक्त करणं जमलं नाही. त्यांनी त्यांच्या भावना आपल्या डोळ्यांच्या अश्रूंमधून व्यक्त केल्या.
तू गेला नाहीस… तू आमच्यासाठी ‘जिवंतच’ राहशील! #IrrfanKhan 🙏🏽🙏🏽🙏🏽 pic.twitter.com/lfHVC5FqNV
— हेमंत ढोमे | Hemant Dhome (@hemantdhome21) April 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन बांगड्यांचं दुकान उघडलं पाहिजे- निलेश राणे
अमेरिकेने भारताला सीरियासारखी वागणूक दिली, मोदी ट्रम्प गळाभेट व्यर्थ गेली- असदुद्दीन औवेसी
महत्वाच्या बातम्या-
डॉक्टरांच्या विनंतीला मान देत, वंचितकडून नायर रुग्णालय कर्मचाऱ्यांना PPE किटचे वाटप
“कधी कधी भावना व्यक्त करणं जमत नाही; आता तेच होतंय इरफानदा!”
…अन् अवघ्या 19 दिवसात व्हाईट हाऊसनं नरेंद्र मोदींना अनफाॅलो केलं!
Comments are closed.