बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील पण…’; खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | 26 नोव्हेंबर 2008 साली भारतावर मोठा दहशदवादी हल्ला झाला होता. त्यात अनेक भारतीय आणि परदेशी नागरिकांचा जीव गेला होता. प्रसिद्ध ताज हाॅटेलवर हा हल्ला झाला होता. या हल्ल्याला मुंबई पोलिसांनी जोरदार प्रत्युतर देऊन दहशदवाद्यांचा नायनाट केला. या हल्ल्यात अनेक पोलीस अधिकारी शहिद झाले होते. त्यात मुंबईचे पोलिस अधिकारी हेमंत करकरे यांनीही आपला जीव गमावला होता. याच शहिद हेमंत करकरेंवर खासदार प्रज्ञासिंग ठाकूर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

हेमंत करकरे काही लोकांसाठी देशभक्त असतील. पण खरे देशभक्त हे वेगळा विचार करतात. माझ्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी करकरेंनी आचार्य-शिक्षकाची बोटं आणि बरगड्या मोडल्या. मला खोट्या प्रकरणात गोवलं, असा आरोप प्रज्ञासिंग ठाकूर यांनी केला आहे. देशात 1975मध्ये पहिल्यांदाच आणीबाणी लागू झाली होती. पण 2008 मध्ये मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात मला अटक झाली तेव्हाही अशीच स्थिती होती, असंही त्या म्हणाल्या आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या मुख्य आरोपी आहेत. या बॉम्बस्फोटात 10 जण ठार तर 82 जण जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना अटक देखील झाली होती. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्यांना नथुराम गोडसेलाही त्यांनी देशभक्त म्हटलं होतं. त्यावरून त्यांच्यावर पंतप्रधानांपासून सर्वांनीच सडकून टीका केली होती.

दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून देशभक्तीच्या मुद्द्यावरून मोठा वाद होताना दिसत आहे. महात्मा गांधींची हत्या करणारे देशभक्त आणि दहशदवादांशी लढताना शहिद झालेले पोलीस देशभक्त नाही, असा तर्क लावल्यानं साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर टीका केली जात आहे. गोमुत्र पिल्यानं कोरोना जातो, असा जावई शोध देखील त्यांनी यापुर्वी लावला होता.

थोडक्यात बातम्या-

जे आहे मराठा समाजाचे खणखणीत नाणे, त्याचं नाव नारायण राणे- रामदास आठवले

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी, वाचा एका क्लिकवर

‘…मग संजय राऊतांच्या छातीत धडकी का भरली’; चित्रा वाघ यांची राऊतांवर टीका

‘मी फार वर्ष असले उद्योग केलेत’; बिगर भाजप आघाडीबाबत शरद पवारांची मिश्किल टिप्पणी

‘परमबीर आयुक्त पदावर होते त्यावेळी…’; ईडीच्या छाप्यानंतर अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More