महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदी हेमंत नगराळे यांची वर्णी!

मुंबई | सुबोधकुमार जैस्वाल यांची केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महासंचालकपदी प्रतिनियुक्ती झाल्यानंतर हे पद कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर हेमंत नगराळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं.

संजय पांडे, हेमंत नगराळे, सुरेंद्र कुमार पांडे आणि रजनीश सेठ यांची नावं पोलीस महासंचालकपदासाठी चर्चेत होती. परंतु नगराळे यांचे पारडे आधीपासूनच जड मानलं जात होतं.

हेमंत नगराळे हे 1987 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. हेमंत नगराळे यांचा 19 महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. हेमंत नगराळे यांनी 2016 मध्ये नवी मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कारभार स्वीकारला होता.

दरम्यान, 2018 मध्ये त्यांची नागपुरात बदली झाली. नगराळे सध्या पोलिस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

थोडक्यात बातम्या-

स्व. मोहनलालजी बियाणा पत्रकारिता सन्मान!; राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा

“…तोपर्यंत शिवसेना औरंगाबादचं नामांतर करूच शकत नाही”

प्रसिद्ध उद्योजक अनिल अंबानी यांना मोठा झटका!

राष्ट्रगीत सुरु असताना भारताचा ‘हा’ खेळाडू भावुक; सिडनीच्या मैदानावर अश्रू अनावर!

‘पोलीस भरती तात्काळ रद्द करा, अन्यथा…’; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा सरकारला इशारा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या