बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे अण्णा हजारे मोदी सरकारच्या काळात गप्प का?”

सातारा | काँग्रेस सरकारच्या काळात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचार बाहेर काढले होते. यावरून इंडिया अगेन्स्ट करपशनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी अण्णा हजारेंवर निशाणा साधला आहे. हेमंत पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे अनेक मुद्यांवर मते मांडली. शेतकरी आंदोलनावरूनही टीका केली आहे. त्यासोबतच त्यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे.

काँग्रेस सरकारच्या काळात भ्रष्टाचार बाहेर काढणारे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे भाजपच्या मोदी सरकारच्या काळात इतके भ्रष्टाचार बाहेर निघाले तरी अण्णा हजारे गप्प का आहेत?, असा सवाल हेेमंत पाटील यांनी केला आहे. दिल्लीत चालू असलेल्या शेतकरी आंदोलनावरूनही हेमंत पाटील यांनी अण्णांवर निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर अंदोलन करु’ असं सांगितलं पण भाजपचे देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे सहकारी राळेगणसिद्धी येथे भेटुन गेले की अण्णा हजारेंनी भूमिका बदलली. सध्या त्यांना भ्रष्टाचाराविरुद्ध काम करायचे नाही वाटते. भाजपच्या काळात होणाऱ्या अफाट भ्रष्टाचारविरोधात आम्ही मैदानात उतरु. मराठा, ओबीसी, धनगर आरक्षण प्रश्नाबाबत आमचा लढा सुरु राहिल, असंही हेमंत पाटील म्हणाले.

दरम्यान, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडू लागले आहेत. तरीही याविरोधात अण्णा हजारे मौन धारण करून बसले असल्याचं म्हणत पाटील यांनी अण्णांना टोला हाणला आहे.

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं आता बघवत नाही”

आधी भुजबळ-फडणवीस अन् आता मोदी-पवार भेटीमुळे शिवसेनेचं भवितव्य अंधारात?

‘…म्हणून शरद पवारांनी मोदींची भेट घेतली’; भेटीवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया

“महाराष्ट्राचा विकास पुढे जात नसल्याने व्यथित झालेल्या पवारांना मोदींसोबत चर्चा करावी वाटली असेल”

“पवार तिथे शंका, तेव्हा 80 तासांचं सरकार बनलं, आता…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More