उद्धव ठाकरे यांच्यापुढेच शिवसेना खासदार आणि आमदार भिडले

नांदेड | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोरच शिवसेनेचे खासदार आणि आमदार एकमेकांसोबत भिडले. नांदेडमध्ये आयोजित शेतकरी संवाद संभेच्या व्यासपीठावर हा प्रकार घडला.

स्थानिक शिवसेना आमदार हेमंत पाटील उद्धव ठाकरे यांचं तसेच उपस्थितांचं स्वागत करत होते. यावेळी खासदार विनायक राऊत यांनी मध्ये येत हेमंत पाटलांना माईक दुसऱ्याच्या हातात देण्याची सूचना केली.

हेमंत पाटील यांनी ही सूचना झिडकारुन लावली. मात्र व्यासपीठावरील नेत्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी विनायक राऊंताना बाजूला नेलं.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या