“मोदी सरकारने भारतीयांना पीएम केअर्स फंडाचा हिशोब द्यावा”

नवी दिल्ली | कोरोना महामारीबाबत केंद्र सरकारच्या ढिसाळ नियोजनावरून वारंवार टीका होताना दिसत आहेत. अशातच झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. द संडे एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सोरेन यांनी आपलं रोखठोक मत मांडलं.

पीएम केअर्स फंडाचं नक्की काय झालं हे केंद्राने देशातील नागरिकांना सांगितलं पाहिजे. पीएम केअर्समध्ये हजारो कोटी रुपये जमा झाले. या फंडासंदर्भातील व्यवहारांमध्ये पारदर्शकता हवी. केंद्र सरकारने यासंदर्भातील हिशोब देशातील जनतेला द्यायला हवा, असं हेमंत सोरेन यांनी म्हटलं आहे.

सर्व महत्वाच्या गोष्टींचं नियंत्रण केंद्राने स्वत:कडे ठेवलं आहे. मग ते अगदी ऑक्सिजनचा पुरवठा असो, वैद्यकीय उपकरणांचं वाटप असो किंवा लसींचं वितरणही. राज्यांना ना योग्य प्रमाणात औषधं दिली जात ना लसी मिळत असल्याचं म्हणत सोरेन यांनी मोदी सरकारवरव टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार कोरोनाच्या साथीला राष्ट्रीय समस्या मानत नाही. तसेच राज्यांनी केलेल्या मागण्या ऐकून समोर आलेल्या परिस्थितीला राज्यांनी आपल्या पद्धतीने तोंड द्यावं, अशा प्रकारचं केंद्राचं धोरण असल्याचं हेमंत सोरेन म्हणाले.

थोडक्यात बातम्या-  

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक संसर्गाचा धोका नाही; एम्सचे संचालक म्हणतात…

 पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीचे भररस्त्यात फाडले कपडे आणि नंतर घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार

किंग कोहलीचा ‘हा’ खास लूक सोशल मीडियावर व्हायरल

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्याला उकाड्यापासून दिलासा; संपूर्ण जिल्हाभरात मुसळधार पावसाला सुरुवात

20 रुपये दिले नाही म्हणून पतीची हत्या, मुलांचा सांभाळ कोण करणार? पत्नीचा टाहो

central governmentcoronamodi governmentNarendra Modipm Care Fundकेंद्र सरकारकोरोनानरेंद्र मोदीपीएम केअर्स फंडमोदी सरकार