Top News

शिवथाळी सुरु होण्याआधीच भाजपचं पोट दुखायला लागलं- राष्ट्रवादी

मुंबई | महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने गरीबांना स्वस्त दरात भोजन मिळावं यासाठी शिवथाळी योजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. 26 जानेवारीपासून राज्यभरात या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. यावर ही घोषणा खोटी असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी म्हटलं आहे. भाजपच्या या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार हेमंत टकले यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे.

शिवभोजन योजनेचा लाभ हा गरिबांना होणार आहे. ही योजना यशस्वी होईल किंवा नाही हा पुढचा भाग आहे. मात्र ही घोषणा खोटी असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे शिवथाळी सुरु होण्याआधीच विरोधकांच्या पोटात दुखायला लागलं आहे, असं हेमंत टकले यांनी म्हटलं आहे.

सरकारच्या शिवभोजन योजनेचा लाभ गरीबांना मिळणार आहे. यामुळे विरोधकांचं पोट दुखेलच. पण त्यावर देखील मार्ग काढण्यात येईल, असं म्हणत हेमंत टकले यांनी विरोधकांवर खोचक टीका केली आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीची कर्जमाफी जितकी फसवी आहे, तितकीच त्यांची शिवभोजन योजना सुद्धा फसवी असल्याचा आरोप राम कदम यांनी केला होता. त्यांच्या याच आरोपाला राष्ट्रवादीनं उत्तर दिलं आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“शिवसेनेने सदैव इंदिरांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि मर्दानगीचा आदर केला”

‘हम ईट का जवाब पत्थर से देना जानते है’; काँग्रेसच्या राऊतांचा शिवसेनेला इशारा

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या