महाराष्ट्र मुंबई

“गुजराती माणसानं उद्धव ठाकरेंना आपडा म्हटलं तर तुमचा का तीळ पापडा झालाय?”

मुंबई | मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी शिवसेनेकडून मुंबईसह राज्यातील गुजरात मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना गुजराती बांधवांचा मेळावा आयोजित करणार आहे. या मेळाव्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी टॅगलाईन वापरली जात आहे.

शिवसेना संघटक हेमराज शाह यांच्यावर गुजराती मतदारांना सेनेकडे वळवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यावरून भाजप नेत्यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. या टीकेला हेमराज शाह यांनी प्रत्युत्तर दिलंय.

गुजराती माणसाने उद्धव ठाकरे यांना आपडा म्हटल्यावर भाजपच्या अतुल भातखळकर यांचा तीळ पापडा झाला बहुतेक! ते कालपासून नुसता खळ खळ करतायत, अशी बोचरी टीका हेमराज शाह यांनी केली आहे.

भाजपने फक्त मतदान होण्यापुरतं गुजराती बांधवांना वापरलं. आपडो माणसं म्हणत नुसती गुजराती बांधव आणि भगिनींची मते घेतली आणि नंतर सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं, असा आरोप हेमराज शाह यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

पाच वर्षांच्या चिमुकल्या नातीच्या ‘या’ वाक्यामुळे आजीने संपवलं आयुष्य!

मिर्झापूर फेम गुड्डू भैय्याची लोकप्रियता शिखरावर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

‘औरंगजेब तुमचा आदर्श आहे का?’; शिवसेनेचा काँग्रेसला सवाल

चाकूचा धाक दाखवून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या तरुणालाच मुलीने भोसकलं!

“सोनिया गांधी आणि मायावतींना ‘भारतरत्न’ देऊन सन्मानित करा”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या