बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पुढील दोन महिने धोक्याचे’; कोवीड टास्क फोर्सनं राज्याला दिला गंभीर इशारा

मुंबई | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या विषाणूचे वेगवेगळे व्हेरिएंट समोर येत असल्यामुळं तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. अशातच आता राज्याच्या कोवीड टास्क फोर्सनं महत्वाचा इशारा दिला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यानं निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. मात्र निर्बंध जरी शिथिल करण्यात येत असले तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. पुढील दोन महिने धोक्याचे असल्याचं मत राज्याच्या टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडलंय. याआधीही निर्बंध शिथिल केल्यानंतर नागरिकांच्या चुकीच्या वागण्यामुळे संसर्ग वाढल्याचं आपण पाहिलेलं आहे, हा अनुभव लक्षात घेऊन येत्या काळात अधिक सतर्कपणे वागलं पाहिजे, असं कोवीड टास्क फोर्सनं सांगितलं आहे.

कोरोना परिस्थितीवर बोलताना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी की, कोरोना होण्याचं प्रमाण कमी झालं असून चाचण्यांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे नागरिकांनी हलगर्जीपणा न करता पुढील दोन-तीन महिने सतर्कतेने वागलं पाहिजे. कोरोना संसर्ग कमी होत असला तरी कोरोनाचा धोका कमी झाला नाही हे सर्वसामान्यांनी लक्षात घ्यायला हवं.

दरम्यान, पुढील दोन-तीन महिन्याच्या कालावधीत अनेक सण-उत्सव आहेत. त्यामुळे हा काळ संसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे. निर्बंध शिथिल केल्यामुळे पुन्हा गर्दी झाल्यास, कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असा इशारा कोवीड टास्क फोर्सनं दिला आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका’; फडणवीसांनी माध्यमांना फटकारलं!

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

कोरोनाचा कहर! आणखी एक नवा व्हेरिएंट आला समोर

खुशखबर! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More