…म्हणून हिमाचल प्रदेशमध्ये भाजपचा पराभव!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

शिमला| सध्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या निकालाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आतापर्यंतच्या झालेल्या मतमोजणीनुसार गुजरातमध्ये भाजपची (BJP)एकहाती सत्ता येणार, हे स्पष्ट होत आहे. तर हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस(Congress) आघाडीवर आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये 68 जागांपैकी काॅंग्रेस 40 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 25 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळं हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेसची सत्ता येऊ शकते, अशा चर्चा आहेत.

हिमाचल प्रदेशमध्ये काॅंग्रेस भाजपपेक्षा 15 जागांनी पुढं आहे. हा आकडा मोठा असल्यानं भाजपसाठी ही मोठी हार आहे. हिमाचल प्रदेशमधील काॅंग्रेसची ही आघाडी पाहून भाजपला हा पराभव जिव्हारी लागेन, अशा चर्चा आहेत.

गेल्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी भाजपनं हिमाचल प्रदेशात 44 जागा मिळवल्या होत्या. परंतु यावेळी भाजपला साध्या 30 जागाही मिळवता न आल्यानं तसेच अपेक्षेपेक्षाही कमी जागा मिळाल्यानं , हिमाचल प्रदेशात भाजमध्ये नाराजी पसरली आहे.

दलित वर्गांकडूनही भाजपचा मोठा अपेक्षा भंग झाल्याचं चित्र आहे. कारण या वर्गाकडून गेल्या वेळीपेक्षा भाजपला 3 कमी जागा मिळाल्या आहेत.

तसेच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर(Jai Ram Thakur) यांचे ज्या भागात वर्चस्व आहे, त्या भागातूनही भाजपला गेल्या निवडणुकीपेक्षा तब्बल 5 जागा कमी मिळाल्या आहेत, भाजपसाठी हाही मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-