बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शिल्पा या प्रश्नांची उत्तरं दे… चौकशीत क्राईम ब्रांचनं विचारले हे 10 प्रश्न

मुंबई | राज कुंद्रा यांच्या अटकेनंतर आता अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिला पोलीस चौकशीला सामोरं जावं लागलं आहे. एवढंच नाही तर शिल्पाच्या घरात क्राईम ब्राँचने छापेमारी देखील केली आहे. पोर्नोग्राफी प्रकरणात रोज नवीन खुलासे होत असून शिल्पाला या चौकशीवेळी 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत.

छापेमारीनंतर पोलिसांनी शिल्पाची चौकशी केली. यावेळी शिल्पाला 10 प्रश्न विचारण्यात आले आहेत. सर्वात आधी तर वियन कंपनी चांगली कमाई करत होती तसेच शेअर मार्केटमध्ये देखील या कंपनीचे भाव उच्च होते तर ही कंपनी सोडण्याचा निर्णय का घेण्यात आला?, असा सवाल विचारला गेला.

चौकशी दरम्यान, हाॅटशाॅट या अॅपबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या अॅपवर दाखवल्या जाणाऱ्या व्हिडीओंविषयी तुम्हाला माहिती आहे का? अशे प्रश्न विचारले असून या व्यवहारात तुम्ही देखील शामिल आहात का?, असा प्रश्न देखील शिल्पाला विचारण्यात आला आहे. यानंतर राज नेमका काय व्यवसाय करतो याची तुम्हाला माहिती होती का?, तसेच राज तुम्हाला आपल्या आर्थिक व्यवाहाराबद्दल माहिती देतो का? हे देखील विचारण्यात आलं.

दरम्यान, पाॅर्न व्हिडीओ लंडनला पाठवण्यासाठी वियान कंपनीच्या ऑफिसचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे का? असा सवाल देखील शिल्पाला विचारण्यात आला. तसेच वियान आणि कॅमरिन या दोन कंपनीमधल्या व्यवाहारबाबत माहिती का? आणि प्रदीप बक्षीसोबत तुम्ही कधी या अॅपबाबत चर्चा केली आहे का? असा प्रश्नही शिल्पाला क्राईम ब्राँचने विचारला. शिल्पाला विचारण्यात आलेला अखेरचा प्रश्न म्हणजे पोलिसांच्या हाती लागलेल्या व्हाॅट्स अॅप चॅट आणि ई-मेल बाबत काही माहिती आहे का?

थोडक्यात बातम्या-

प्रवाशांनी भरलेल्या बसनं अचानक घेतला पेट, पाहा धक्कादायक व्हिडीओ

सरकारी कर्मचाऱ्यांनो फोनवर बोलताना आता नीट बोला, ‘या’ 9 सूचना पाळाव्या लागणार!

चक दे इंडिया! टोकियो ऑलिम्पिकमध्ये रोमहर्षक लढतीत भारताची विजयी सलामी

पुढील 3 दिवस अत्यंत धोक्याचे, महाराष्ट्रातील ‘या’ भागाला गंभीर इशारा

“…तर ते स्वतःच स्वतःसाठी खड्डा खणत आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More