गुंतवणूक करताय? ‘ही’ बँक देतीय भरभरुन व्याज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

नवी दिल्ली | नवीन वर्षात कमी व्याजदरात बँकेतून कर्ज घेऊन नवीन गोष्ट खरेदी करणं अवघड बनलं आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो दरात वाढ केल्यानंतर बँकांनी कर्ज आणि EMI मध्ये देखील वाढ केली आहे.

रेपो (Repo) दरात 0.35 टकक्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे बँकांना देखील फटका बसल्याने बँकांनी हा निर्णय घेतला आहे. अशातच फिक्सड डिपाॅझिट वरील व्याजदरदेखील वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र युनिटी बँक लिमिटेड ही बँक ज्येष्ठांसाठी अगदी कमी व्याजदर देत आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी युनिटी बँक (Unity Bank) फिक्सड डिपाॅझिटसाठी 9 टक्क्यांचा व्याजदर देत आहे. हा व्याजदर मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना युनिटी स्माॅल फायनान्स बँकेत 181 आणि 105 दिवसांच्या मुदत ठेवी गुंतवाव्या लागतील.

या गुंतवणुकीनंतर त्यांना 9 टक्के इतकं वार्षिक व्याज मिळू शकतं. दुसरीकडे इतर गुंतवणूकदारांना या कालावधीसाठी मुदत ठेवींवर 8.50 टक्के इतका व्याज मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर फिक्स डिपाॅझिट (Fixed Deposit) करण्याचा प्लॅन करत असाल तर या स्किमचा फायदा तुम्ही घेऊ शकता.

इतर लोकांसाठी 181 दिवसांच्या मुदतठेवीसाठी ती मॅच्युअर झाल्यानंतरच्या एफडीवर 8.50 टक्क्याचा व्याजदर (Interest rate) मिळणार आहे. 182 पासून 364 दिवसात मॅच्युर होणाऱ्या एफडीला 6.75 टक्क्याचा व्याजदर मिळत आहे.

दरम्यान, या युनिटी बॅकेत नाॅन-काॅलेबल (Non-callable) डिपाॅझिटवर जास्तीत जास्त 8.10 टक्क्याचा व्याजदर मिळत आहे. नाॅन काॅलेबल ठेव म्हणजे ज्याच्यावर मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध नसतो.

महत्त्वाच्या बातम्या