बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अबब… गाड्या विकता की केसावर फुगे??? ‘या’ कंपनीनं एका दिवसात विकल्या 1 लाख गाड्या!

नवी दिल्ली |  भारतामधील हिरो मोटोकॉर्प दुचाकी कंपनी जगभरातील 40 देशात पोहचल्याने ती आता बहूराष्ट्रीय कंपनी झाली आहे. कंपनीची विक्री आणि वितरण सेवा जगभरात 6000 केंद्रामधून चालते. या कंपनीचा भारतातील दुचाकी बाजारपेठातील हिस्सा 51 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. अशातच उत्पादनात आघाडीवर असलेली हिरो मोटोकॉर्प या कंपनीने आता एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनूसार 9 ऑगस्ट रोजीच्या एका दिवसात 1 लाख पेक्षा अधिक दुचाकी विकल्या आहेत. एंट्री, डीलक्स आणि प्रीमियम या तिन्ही दुचाकीच्या सेगमेंटमध्ये वाहनांची मागणी वाढल्याचं कंपनीने सागितलं आहे. दुचाकी गाड्यांची 1 लाख पेक्षा अधिक विक्री होण्यामागे अलिकडेच लाॅंच करण्यात आलेल्या बाइक सेगमेंटमध्ये ग्लॅमर एक्सटीईसी, स्प्लेंडर मॅट गोल्ड आणि एक्सट्रीम 160 आर यांचा समावेश आहे. तर स्कूटर सेगमेंटमध्ये मेस्ट्रो एज 125, डेस्टिनी आणि प्लेझर यांना ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात लोकांनी पसंती दिली आहे.

याच वर्षी हिरो मोटोकॉर्प दुचाकी कंपनी ही हिरो होंडा कंपनी पासुन वेगळी झाली. तशाच हिरो कंपनीने या वर्षी 10 वा वर्धापन दिन साजरा केला आहे.  पुढील महिन्यांत येणाऱ्या सणांमध्ये वाहन खरेदी करण्यासाठी लोक खुप उत्साही आहेत, असं कंपनीने सांगितलं आहे.

दरम्यान, हिरो मोटोकॉर्प दुचाकी कंपनीने 29 जुलैला 1824 हिरो स्प्लेंडर प्लसच्या गाड्या एकाच ठिकाणी उभ्या करून हिरो चा सर्वात मोठा लोगो बनवला. त्यामुळे या कंपनीचं नाव ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये नाव नोंदवून अनोखा विक्रम केला आहे. हा लोगो बनवण्यासाठी 100 लोकांनी मेहनत घेतली होती.

 

 

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! सुवर्णपदकवीर नीरज चोप्रा रूग्णालयात दाखल, तब्येत पुन्हा बिघडली!

‘नवरा मुर्ख वाटायला लागतो’, पाहा भन्नाट मराठी कविता

देशातील 10 लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे टॉप 5 मध्ये!

डेल्टा प्लसचे रुग्ण वाढले तरी काळजी करण्याची गरज नाही- राजेश टोपे

कौतुकास्पद! पोराने आईच्या कष्टाचं केलं चीज, 50 व्या वाढदिवसाला दिलं खास गिफ्ट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More