Electric Vehicles l इलेक्ट्रिक दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा काळ असताना, बाजारात दररोज नवनवीन इलेक्ट्रिक वाहने दाखल होत आहेत. टीव्हीएस, बजाज, ओला, एथर या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींनी बाजारात चांगलाच जम बसवला आहे. मात्र, या स्पर्धेत आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी हीरो मोटोकॉर्प काहीशी मागे राहिलेली दिसते. सध्या त्यांच्या इलेक्ट्रिक दुचाकींच्या यादीत फक्त ‘विदा व्ही वन’ ही एकच गाडी आहे. पण आता, लवकरच कंपनीच्या इलेक्ट्रिक पोर्टफोलिओमध्ये मोठी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, लोकप्रिय स्प्लेंडर ही दुचाकी देखील इलेक्ट्रिक अवतारात येण्याची शक्यता आहे.
हिरो कंपनी इलेक्ट्रिक दुचाकींच्या क्षेत्रात मोठे नियोजन करत आहे. 2027 मध्ये ‘विदा लिंक्स’ ही इलेक्ट्रिक डर्ट बाइक सादर करण्याचे त्यांचे नियोजन आहे. मुख्यत्वे विकसित आंतरराष्ट्रीय बाजारासाठी असलेल्या या गाडीची दरवर्षी १० हजार युनिट्स विक्री केली जातील. त्यानंतर, २०२७ मध्ये कंपनी ग्राहक आणि किमतीच्या व्यापक रेंजचा विचार करून नवीन इलेक्ट्रिक दुचाकी सादर करेल.
Electric Vehicles l इलेक्ट्रिक स्प्लेंडरवर काम सुरू
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरो मोटोकॉर्प कंपनी आपल्या आणि देशाच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या हीरो स्प्लेंडरच्या इलेक्ट्रिक व्हर्जनवर काम करत आहे. कंपनीच्या इलेक्ट्रिक प्रोजेक्टमध्ये या दुचाकीचा समावेश आहे. जयपूरमधील सीआयटी या टेक्नॉलॉजी सेंटरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून यावर काम सुरू आहे. २०२७ मध्ये ही दुचाकी लाँच होण्याची शक्यता आहे. ‘AEDA’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या प्रोजेक्ट अंतर्गत दरवर्षी सुमारे दोन लाख युनिट्सची विक्री करण्याचे नियोजन आहे.
तरुणांना आकर्षित करण्यासाठी नवीन मॉडेल्स :
‘AEDA’ प्रोजेक्टचे उद्दिष्ट दैनंदिन व्यावसायिक वापरकर्ते किंवा कम्युटर सेगमेंट आहे. तर ‘ADZA’ प्रोजेक्ट अंतर्गत आणखी दोन दुचाकी बनवण्याचे नियोजन केले जात आहे. १५० सीसी आणि २५० सीसी ICE मॉडेल्सच्या तोडीच्या मॉडेल्सचा त्यात समावेश असेल. तरुणांना आकर्षित करणारी स्टाईल आणि परफॉर्मन्स ही या मॉडेल्सची खासियत असेल.
News Title: Hero MotoCorp to Launch Electric Splendor Soon!
महत्वाच्या बातम्या-
पोस्ट ऑफिसची ‘ही’ स्कीम करेल मालामाल; व्याजातूनच कराल बक्कळ कमाई
पीएम किसान योजनेच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर!
सावधान! शनिदेवाकडून ‘या’ राशींच्या कर्मांचा हिशोब, नशीब बदलणार
गँगचा लीडर कोण?, CID च्या तपासात खळबळजनक खुलासा
Elon Musk देणार नोकरी, डिग्रीचीही गरज नाही, इथे करा अर्ज