बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हर्षल पटेलची हॅट्रिक! हार्दिक, पोलार्ड आणि राहुलला दाखवला घरचा रस्ता

मुंबई | राॅयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएलचा 39 वा सामना खेळवला गेला. सुपर संडेला या दोन आक्रमक संघात आज चांगली लढत पहायला मिळाली. या सामन्यात बंगळुरूचा गोलंदाज हर्षल पटेलने सलग तीन विकेट घेत हॅट्रिक केली आहे.

मुंबई इंडियन्सला सामना जिंकण्यासाठी 4 षटकात 61 धावांची गरज होती. त्यावेळी विराट कोहलीने 16 वं षटक टाकण्यासाठी हर्षल पटेलकडे चेंडू सोपवला. त्यानंतर हर्षलने कमाल केली. 16 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूत त्याने मुंबईचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचा विकेट घेतली. विराट कोहलीने त्याचा झेल घेतला.

त्यानंतर दुसऱ्या चेंडूत हर्षलने घातक अशा कायरन पोलार्डला घरचा रस्ता दाखवला. हर्षलने पोलार्डचा त्रिफळा उडवला होता. पोलार्डला केवळ 7 धावा करत आल्या. तर पालार्ड बाद झाल्यानंतर आलेल्या राहुल चहरला देखील हर्षल पटेलेने एलबीड्ब्लू बाद केलं. आतापर्यंत मुंबई इंडियन्सविरूद्ध कोणालाही हॅट्रिक घेता आली नव्हती. तो कारनामा आता हर्षदने केला आहे.

दरम्यान, या सामन्यात या सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरूने 54 धावांनी राॅयल विजय मिळवला आहे. तर मुंबईचा या सामन्यात दारूण पराभव केला झाला आहे. त्यामुळे आता मुंबईची प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा मावळताना दिसत आहेत.

थोडक्यात बातम्या-

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, वाचा आजची आकडेवारी

नाना पटोले म्हणतात, “मी बोलतो तेच करतो, दादापेक्षा नाना मोठा…”

राज्याच्या कोरोना रूग्णांच्या आकडेवारीमध्ये चढ-उतार, जाणून घ्या आजची आकडेवारी!

पुणे कोरोनामुक्तीच्या वाटेवर, वाचा आजची ताजी आकडेवारी

‘पश्चिम महाराष्ट्राचं पाणी मराठवाड्याला आणणार’; जयंत पाटलांनी सांगितला मेगा प्लॅन

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More